रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-
हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात करणे शुभ मानले जाते. तसेच प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास करुन माता सीतेसह आपल्या नगरीमध्ये परतले होते, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता, म्हणूनचा या दिवशी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात हिंदू नववर्षाचे स्वागत हे मोठ्या दिमाख्यात साजरे केले गेले. पुणेरी ढोल ताशाच्या गजरात तसेच वारकरी संप्रदायाच्या मृदूंगात भजन ,ताळ ,कीर्तन करून रोह्यातील ऐतीहासिक श्री राम मारुती चौक ते तीनबत्ती नाका,पोलीस चौकी , नगरपालिका ते पुन्हा श्री राम मारुती चौक या मार्गी प्रभातफेरी काढून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. ह्या वेळी रोह्यातील तरुण मंडळींनी पारंपरिक पेहराव करून रोहेकरांचे लक्ष वेधी ठरले. रोहा पोलिसांचा चोख बंदोबस्त ह्या वेळी पाहण्यात आला. ह्या समस्त कार्येक्रमाचे नियोजन हे स्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले होते. ह्या प्रसंगी राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे गटनेते माजी नगरसेवक श्री महेंद्र गुजर ,माजी उपनगराध्यक्ष समीर भाई सकपाळ, भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग , सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर , स्फूर्ती प्रतिष्ठानचे सुमित रिसबूड त्याच प्रमाणे सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…