व्हिलचेअरवरील द्रविडची विचारपूस करणाऱ्या धोनीने जिंकली प्रेक्षकांची मने… 

0
74
मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :- 

     चेन्नई सुपर किंग्ज्स संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिगं धोनी याने पुन्हा आपल्या संवेदनशील वृत्तीचा परिचय दिला आहे. काल आयपीएल मधील राजस्थान रॉयल्स विरूद्धचा सामना संपल्यानंतर धोनीने थेट व्हिलचेअर असलेल्या राहुल द्रविडकडे धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि बराच वेळ राहुल बरोबर गप्पा मारण्यात व्यथित केला, मात्र याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामुळे महेंद्रसिगं धोनीने पुनः एकदा भारतीय क्रिकेट शौकीनांची मने जिंकली आहेत, एवढे नक्कीच.