अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावात सालाबादप्रमाणे यावर्षीही जय हनुमान क्रीडा मंडळ धोकवडे यांच्यातर्फे कै. माजी आमदार मधुशेठ ठाकूर उर्फ ( पप्पा ) यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत…ही स्पर्धा २८ मार्च २०२५ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत धोकावडे गावात संपन्न झाली…कै.माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे यंदाचे चौथे पर्व होते…या स्पर्धेच्या माध्यमातून समाजातील बांधवांना एकत्र आणण्याचा आणि क्रिकेटप्रेमींना खेळण्याची संधी देण्याचा उद्देश आहे…या सामन्यांचे नियोजन उत्तमरीत्या करण्यात आले असून त्यामुळे खेळाडूंना देखील वेगळा अनुभव मिळाला आहे…या सामन्याचे उदघाटन २८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले…कार्यक्रमास प्रमुख उद्घाटक म्हणून ऍड प्रविणदादा ठाकूर व प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद आमदार भाई जगताप यांची उपस्थिती होती…स्पर्धा काळात सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरीता व स्पर्धेची शोभा द्विगुणीत करण्याकरिता अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती…स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक समाजबांधव यांनी विशेष मेहनत घेतली…युवकांमध्ये एकता वाढवण्यासाठी आणि क्रीडाक्षेत्रात पुढे जाण्यासाठी हा एक उत्तम प्रयत्न आहे…
३० मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचा बक्षिस समारंभ करण्यात आला…यावेळी सर्व विजयी संघांना व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात आले…स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती…स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली…स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवप्रसाद तोडणकर,समीर म्हात्रे,उपकार्याध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे,किरण तोडणकर,ज्येष्ठ नरहरी तोडणकर,स्वप्नील म्हात्रे,करण म्हात्रे,मितेश तोडणकर,कुंदन तोडणकर यांनी विशेष मेहनत घेतली…यावेळी स्पर्धेदरम्यान हास्य जत्रा फेमचे सुप्रसिद्ध संगीतकार अमीर हडकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी फोनद्वारे संवाद साधला आहे…पाहुयात काय म्हणाले आहेत ते….