रायगडमधील मनसे अ‍ॅक्शन मोडवर … बँकांमध्ये मराठी सक्तीची करण्याचे मनसेकडून आदेश …

0
27

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :- 

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला सर्व बँकांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचे आदेश दिले यानंतर रायगड जिल्ह्यातील मनसैनिक देखील आक्रमक झालेत…आज शहरातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा आलीच पाहिजे त्यानंतर बँकांमधील सर्व व्यवहार मराठीतच झाले पाहिजेत…शिवाय येथील कर्मचारी सुद्धा मराठी बोलणारे असले पाहिजेत अशी तंबी या मनसैनिकांनी यावेळी बँकेमधील व्यवस्थापकांना दिली…यावेळी अलिबाग तालुक्यातील मनसैनिक उपस्थित होते…