रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-
आपटा कोळीवाडा ते कार्ला एकविरा आई पदयात्रा ही 125 वर्षांपेक्षा जास्त काळातील वडिलोपार्जित चालत आलेली परंपरा आहे…हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्रातील तमाम भक्तगणांचे आणि विशेषतः आगरी कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवीचा पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या भक्ती वातावरणात साजरा केला जातो… यंदाचा मानाचा पालखीचा मान पनवेल तालुक्यातील आपटा येथील कोळी बांधवांना मिळाल्याने सर्वच भक्तगणांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण दिसून येत होते. बुधवारी सकाळी सात वाजता आपटा कोळीवाडा येथून या पालखी सोहळा चा प्रारंभ झाला… परिसरात एकविरा आईची ठिकठिकाणी महिलांनी खणानारळाने ओटी भरून पूजा केली. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भक्तांना ठीक ठिकाणी नाष्टा अल्पोपहार, थंड पेय, चहा,फळांची व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन जोरदार स्वागत केले…पालखी सोहळ्यात अबाल वृद्धांसह हजारो भक्तगण सहभागी झाले होते.वाजत गाजत फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत व आई एकविरेच्या जय घोषणाने रसायनी परिसर दुमदुमून निघाला…या पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रसायनी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता…