दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
दापोली तालुक्यातील दाभोळ येथून दापोलीकडे येणाऱ्या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना घडली आहे. ब्रेक लागत नसल्यामुळे चालक भाऊराव धोत्रे यांनी प्रसंगावधान दाखवत एस.टी. बस थेट रस्त्याला लागून असलेल्या गटारामध्ये उतरवली…या अपघातात एस.टी. बसचे नुकसान झाले आहे…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल भाऊराव धोत्रे हे एस.टी. बस घेऊन दाभोळ हून दापोलीच्या दिशेने जात होते बस वळणे येथे आली असता त्यांनी गाडीचा ब्रेक मारला असता ब्रेक लागला नाही… बसचे ब्रेक फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने गाडी थांबविण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या गटारात बस उतरवली… या अपघातात बस मधून प्रवास करणारे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत… जखमी प्रवाशांना उपचारासाठी उप-जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एस.टी. बसचे अंदाजे १० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे… या अपघाताची माहिती बसचे चालक राहुल भाऊराव धोत्रे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे… अथिक तपास सहायक पोलीस उप-निरीक्षक अशोक गायकवाड करीत आहेत…