महिलांचे कपडे चोरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद… पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल…

0
25

महाड शिवसत्ता टाइम्स रेश्मा माने

महाड शहरातील पंचशीलनगर-नवेनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरणारा इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. नवेनगर येथील रहिवाशी प्रदीप अनंत सोंडकर यांनी संबंधित आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार व आरोपी हे एकाच नगरांमधील राहणारे असून एकमेकांचे शेजारी आहेत. रात्रीच्या वेळेस महिलांचे कपडे चोरीला जातात, तब्बल सहा महिने हा प्रकार सतत चालू होता याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांनी सीसीटीव्ही फुटेज बसवले आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलांचे कपडे चोरणारा कैद झाला…निलेश इल्या बाळा एनकर असे कपडे चोरणाऱ्या आरोपीचे नाव असून महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 305 (b) कलमाप्रमाणे किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. मात्र पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पाटील या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास करीत आहेत.