रोडपली शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
आई तुळजाभवानी मातेवर लाखो भक्तांची श्रद्धा आहे.नवरात्रोत्सवाचे निमित्त साधून श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रोडपाली बस टर्मिनलच्या मैदानावर महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष या मंदिराचा गाभारा सुद्धा हुबेहूब साकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्याचे समाधान भाविकांना मिळत आहे. सहा फूट उंच आणि चार फूट रुंदी असणारी देवीची ही मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी देवी आणि मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिकृती श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साकारण्यात आली आहे. रोडपाली व कळंबोलीमधील या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या नवरात्रोत्सवाचे आयोजन प्रदीप ठाकूर यांनी केले आहे.तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी आदिशक्तीचे हे मूळ स्थान मानले जाते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीला अग्रमान आहे.नाकात नथ, गळ्यात वेगवेगळे दागिने, दररोज ठरलेल्या रंगाची साडी आई तुळजाभवानीला नेसवण्यात येते. एकंदरीतच रोडपाली कळंबोलीचे वातावरण यामुळे भक्तिमय झाले आहे. देवीचा गाभारा पुठ्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आला… श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रोडपाली कळंबोली कुलस्वामिनीच्या पुढे गरबा खेळला जात आहे.त्याचबरोबर हरिपाठ, संगीत भजन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जात आहेत. यंदाच्या या उत्सवाला गेल्या तीन दिवसांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजक प्रदीप ठाकूर यांनी दिली आहे.एकंदरीतच रोडपालीत तुळजापूर अवतरल्याचा प्रत्यय अनेकांना येत आहे