ब्रेकिंग न्यूज…आजीने नातवासहित उडी मारून जीवन संपवलं…. आजीचा जागीच मृत्यू तर नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू… 

0
22

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-

रायगडच्या रोह्यामधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे…रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड रोडलगत असलेल्या ओम चेंबर बिल्डिंगमधले रहिवासी.सौ उर्मिला सिद्धाराम कोरे वय 52 यांनी 1 वर्षाच्या आपल्या नातवासहित आज सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान राहत्या बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली…एका आजीने आपल्या नातवासहीत एका बिल्डिंग वरून उडी मारून आपलं जीवन संपवल्याने रोहा शहरात खळबळ उडाली आहे…  नातवाच्या हातापायाना लागले असल्याने तात्काळ पनवेल येथे एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले होते…परंतु या घटनेमध्ये नातवाचा मृत्यू झाला असल्याची बातमी आता समोर येत आहे…यामध्ये सौ कोरे यांचा देखील जागेवरच मृत्यू झाला. सदरची घटनेची माहिती पोलिसांना  मिळताच पोलीस घटनास्थळी पोलीस दाखल होऊन  घटनेचा पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय हलविण्यात आला आहे… परंतु आत्ता या घटनेमध्ये दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे… या घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस स्टेशन करीत आहे.