माजी आमदार पंडित पाटील लवकरच भाजपात जाणार… 16 तारखेला भाजपात स्वागत होणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन… 

0
23

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार पंडित पाटील,अ‍ॅड.आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले…रायगड प्रीमियर कबड्डी लीगच्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी मोठं राजकीय भाष्य केले…माजी आमदार पंडित पाटील यांच्यासारखे अनुभवी व तळाघरातील शेतकरी कष्टकरी वर्गासाठी गेली अनेक वर्षे जनतेसाठी काम करतात… पंडित पाटील, आस्वाद पाटील,चित्रा पाटील ही ग्राउंडवर काम करणारी नेतेमंडळी आहेत…ते वर्षानुवर्षे शेतकरी कामगार वर्गासाठी  झगडतात…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे…पंडित पाटील यांनी भाजप प्रवेशाला होकार दिला आहे,त्यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला फायदा होईल,१६ एप्रिल रोजी त्यांचा भाजप पक्षप्रवेश होणार आहे, त्यांचे आम्ही स्वागत करतो…असे चव्हाण म्हणाले…वर्षानुवर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून होत असतो…या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत, यावेळी ते महाराष्ट्राला व उपस्थित शिवप्रेमींना संबोधित करतील असे रवींद्र चव्हाण म्हणाले…