डंपिंग ग्राउंडवरील कचऱ्याला लावलेली आग व धूर तापदायक…परिसरातील नागरिकांचे आरोग्य चिंतेच्या भोवऱ्यात…

0
17

म्हसळा शिवसत्ता टाइम्स (गणेश म्हाप्रळकर) :- 

रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतचा कचऱ्याचा प्रश्न सध्या नागरिकांची डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे… डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याला वारंवार आग लावून या आगीतनं निघालेल्या धुराचा आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत… शहरातील काही होतकरू तरुणांनी याबाबतीत पुढाकार घेऊन नगरपंचायतीला कचरा विलगीकरणाच्या बाबतीत चांगलेच फटकारले आहे… कचरा विलगीकरणाच्या नावाखाली नगरपंचायत पैसा खर्च करते मात्र हा पैसा विलगीकरणासाठी न वापरता त्याचा वापर आयोग्य रीतीने होत असल्याचा आरोप देखील या तरुणांनी केला आहे…