अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर) :-
अलिबाग रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे…. जिल्ह्यात अलिबाग, तालुक्यात ४७ गावे आणि ३३ वाड्यांवर भीषण पाणीटंचाई असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे, तर अलिबाग तालुक्यातील उमटे धरणानेही तळ गाठल्याने ४७ गावांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे…. जिल्ह्यातील २८ धरणांत केवळ ४२ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे….
रायगड जिल्हा टँकरमुक्त होण्याचे स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही…. फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक भागांत जिल्ह्यात पाणीटंचाई डोके वर काढते…. जिल्ह्यातील पाणी समस्या सुटावी, यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली आहे… चौदाशे पैकी साडेसातशे योजना पूर्ण झाल्या आहेत…. मात्र, तरीही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही… अनेक योजना पूर्ण होऊनही नागरिकांना आजही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे…. याबाबत सामाजिक कार्यकर्ता राकेश पाटील आणि नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांनी प्रतिक्रिया दिल्या….