वीर रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यासाठी भरतशेठ गोगावलेंनी रेल्वेमंत्र्यांना भेटून केले निवेदन सादर…

0
52

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे) :-

          कोंकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना महाड शहरानजीक असणाऱ्या “वीर” स्टेशनवर थांबा नसल्याने या गाड्यांचा फायदा महाड, पोलादपूरसह मंडणगड व दापोली तालुक्यातील प्रवाशांना होत नाही…

यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी करुनही वीर स्थानकात एकही लांब पल्ल्याची गाडी थांबत नाही…. या गाड्या पकडण्यासाठी या तालुक्यांतील नागरिकांना माणगांव, चिपळूण, रोहा ते पनवेल पर्यंत फरफट करावी लागते…. येथील जनतेची ही दगदग थांबावी यासाठी “वीर” स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा अशा मागणीचे एक निवेदन भरतशेठ गोगावले यांनी दिल्ली भेटी दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहे….

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे संसद भवनात भेट घेऊन  मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली…. यावेळी खासदार संदीपान भुमरे देखील उपस्थित होते…. रायगड जिल्ह्यातील गोरेगांव व वावे स्टेशन्स येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे तसेच वीर स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्याबाबत सविस्तर चर्चा करून त्याबाबतचे निवेदन गोगावले यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले….