घरफोडी करणाऱ्या चोरट्याच्या खारघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या… गॅलेक्सी करीना सेक्टर १५ खारघरमध्ये केली धडक कारवाई…  

0
20

खारघर शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):-  

खारघरमधील एका फ्लॅटमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात खारघर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे… या आरोपीने तब्बल १ लाख ०५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केले… आकाश बालाजी गिरी (वय १९) असे अटक आरोपीचे नाव असून हा खारघर सेक्टर १५ परिसरातील राहणारा आहे. गॅलेक्सी करीना सेक्टर १५ खारघर येथील डॉ. संदीप पिटके (वय ४२) यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली होती… चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले… फिर्यादीच्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला… वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा काळे, प्रदीप आवड, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे फिरोज आग, प्रशांत जाधव, सुरज वायदंडे, वाजीत शेख, राहुल डावरे, सागर पाटील यांची चार पथके तयार करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून त्याआधारे संशयित आरोपी निष्पन्न झाला… त्याचा शोध घेण्यासाठी अंदाजे ३० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीच्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन अधिक तपास पोलीस करत आहे…