जखमी पोपटाला दोन महिने सांभाळून दिले जीवदान… प्राणी मित्र रामदास काईनकर यांच्या कार्याचे कौतुक…

0
17

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी गावचे पशु,पक्षी मित्र,पर्यावरण पुरक काम करणारे, अपघातग्रस्त यांना मदत करणारे रामदास काईनकर यांना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर सागर देशमुख यांच्या विट भट्टीजवळ फेब्रुवारी महिन्यात एक जखमी पोपट दिसला, कामाच्या धावपळीत असलेले रामदास काईनकर यांनी त्याला आपल्या गाडीत घेऊन त्यांना अवगत असल्या प्रमाणे मलम पट्टी आणि औषध उपचार केले.आपल्या शेतात त्यांनी त्याला मोकळा सोडला, व त्याच्यासाठी पाणी आणि खाणे एक भांड्यात घालून ठेवले, पोपट नियमीत येऊन खाऊ लागला,पाणी पिऊन जायचा…साधारण दीड महिन्यांनी पोपट त्याच्या मित्रांच्या सहवासात गेला,त्यामुळे घरी असलेली छोटी मुले हिरमुसली असताना पंधरा दिवसांनी पुन्हा त्याचे आगमन झाले.त्याला खाण्यास अन्न व पाणी ठेवले जाते, आता दररोज येऊन तो खाऊन पिऊन आपल्या मित्रांच्या सहवासात जातो…पशु पक्षी यांच्यावर प्रेम केल्यावर त्यांचे प्रेम अनुभवायला मिळते,असे रामदास काईनकर यांनी सांगितले.