अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
पेण-अलिबाग रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने लांब रांगा दिसत आहेत…खड्डे आणि अपुरे रस्ता काम या कारणांमुळे ही कोंडी झाली आहे. विशेषतः सुट्ट्या आणि गणेशोत्सवासारख्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी अधिक होत असते…मात्र आता लागोपाठ सुट्ट्या असल्याने पर्यटक आणि चाकरमानी बाहेर पडले आहेत… त्यामुळे पेण-अलिबाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. ट्रॅफिक जाममुळे त्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे…विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कोठेही वाहतूक पोलीस दिसून येत नाही.