महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा पक्षप्रवेशांचा धडाका सुरू केला आहे. नुकत्याच ठाकरे गटाच्या विधानसभेच्या पराजित उमेदवार यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पराभवाचे खापर फोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे…महाड मतदार संघात आता ठाकरे गटाला मोठी गळती लागली असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या नेत्यासोबत राष्ट्रवादीत न जाता नामदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. आज ठाकरे गटाला महाडमधील नाते विभागात जोरदार धक्का बसला असून मांडले गावातील आणि मांडले बौद्धवाडीतील असंख्य अशा ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणाली वरती विश्वास ठेवत शिवसेना पक्षात दाखल झाले आहेत. यामध्ये मांडले गावातील श्रीकांत पांडुरंग तांदलेकर, दीपक पांडुरंग तांदलेकर, संतोष मारुती तांदलेकर, संदीप तांदळेकर,संतोष तांदलेकर, अर्जुन साळुंके, रमेश साळुंखे, सचिन देवजी शिंदे, शारदा तांदलेकर, अश्विनी तांदलेकर, रत्ना तांदळेकर, ललिता तांदळेकर, पूजा निंबाळकर, सानिका साळुंखे, रेश्मा तांदळेकर, उषा तांदळेकर आणि बौद्धवाडी येथील भीमराव सावळे, भरत कृष्णा साळवे, योगेश जीवन हलदे, दिलीप साळवे, देविदास साळवे, हिरामण पांडुरंग साळवे, आनंद कृष्णा साळवे, अभिषेक आनंद साळवे, समीर सिद्धार्थ साळवे, विशाल दिलीप साळवे, विनोद गंगाराम हळदे, अशा असंख्य ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी नामदार भरतशेठ गोगावले , शिवसेना जिल्हा समन्वयक विजय आप्पा सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक, महाड विधानसभा संपर्कप्रमुख राजेश देशमुख,तालुकाप्रमुख रवींद्र तरडे, यांचा सह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.