माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान शुक्रवार -शनिवार रात्र कालीन ब्लॉक…पश्चिम रेल्वेच्या ३०० हून अधिक लोकल होणार रद्द…

0
25

मुंबई शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे):-

मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणी निमित्ताने शुक्रवार, दि. ११/४/२०२५ ते शनिवार, दि. १२/४/२०२५ दरम्यान पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात आहे.पश्चिम रेल्वेच्या अप जलद मार्गावर शुक्रवारी रात्री ११.०० पासून शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत तर डाऊन जलद मार्गावर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० पर्यंत पश्चिम रेल्वेच्या अप जलद मार्गावर शुक्रवारी रात्री ११.०० पासून शनिवारी सकाळी ८.३० पर्यंत तर डाऊन जलद मार्गावर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी रात्री १०.२३ वाजता चर्चगेट-भायंदर किमी गाडी सुटेल तर रात्री १०.४० वाजता चर्चगेट-विरार जलद गाडी सुटेल.रात्री ११.५८ वाजता चर्चगेट-विरार लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावेल, त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम जंक्शन व खार रोड स्थानकांवर थांबणार नाही.ब्लॉक दरम्यान गोरेगांव ते वांद्रे हार्बर मार्गावरून लोकल धावतील.तसेच विरार आणि अंधेरी दरम्यान जलद आणि धिम्या मार्गांवरून लोकल्स चालविण्यात येतील.शुक्रवारी बोरीवली वरून चर्चगेटसाठी शेवटची धिमी लोकल रात्री १०.१५ सुटेल. यानंतर उर्वरित सर्व बोरीवली-चर्चगेट लोकल्स सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद लाईनवरून धावतील त्यामुळे खार रोड, माहीम जंक्शन, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकांवर थांबणार नाहीत.