महाड शिवसत्ता टाइम्स (रेश्मा माने):-
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील सडे मानेवाडी गावात ९ एप्रिलच्या मध्यरात्री घरात घुसून झोपलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे हातपाय बांधून तीन लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्याने मंडणगड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे…
याबाबत सविस्तर घटना अशी की रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील सडे मानेवाडी गावातील नंदकिशोर परशुराम माने वय वर्ष ६५ हे झोपलेले असताना मध्यरात्री तीन अज्ञात व्यक्ती घराच्या किचनमधील स्लाइडिंग खिडकीमधून आतमध्ये घुसले ही गोष्ट माने यांना कळताच ते जागे झाले मात्र अज्ञात चोरट्यांनी त्यांना हातपाय व टॉवेलने बांधून मानेवर धारदार कोयता ठेवत ओरडलास तर जीवे ठार मारू” अशी धमकी दिली त्यामुळे माने हे काही करू शकले नाहीत…
मंडणगड तालुक्यातील सडे मानेवाडी गावातील नंदकिशोर माने यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करतात त्यांच्या तोंडावर चादर टाकून बेड जवळील कपाट उघडले व त्यातून वीस हजार रुपये रोख तर दुसऱ्या थैलीतील ३५ हजार रुपये रोख… चार तोळ्याची सोन्याची चैन असा २,३६,००० हजार रुपयांचा दैवत चोरट्यांनी चोरून नेला…
याबाबत मंडणगड पोलीस ठाण्यात दहा एप्रिल रोजी गुन्हा नोंद केला असून गुन्हा क्रमांक११/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२४ च्या कलम ३०९(४), ३०५, ३३१(४) व३५१(२) (३) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या परिसरात असणारा सीसीटीव्ही द्वारे पोलीस तपास करीत आहेत… मात्र या घटनेमुळे अनेक गावात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळेस पोलिसांनी नाकेबंदी करून यापुढे चोऱ्या होणार नाहीत याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे… याबाबत मंडणगड पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही…