रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत… अमित शाह हे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करणार आहेत. त्यानंतर अमित शाह हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन करणार आहेत… अमित शाहांच्या स्नेहभोजनासाठी तटकरेंनी महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी ठेलली आहे… अमित शाहांसाठी खास आमरस पुरीचा बेत आखण्यात आलेला आहे. अमित शाहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत… अमित शाहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. स्नेहभोजनावेळी सुनील तटकरे आपल्या लेकीच्या पालकमंत्रीपदासाठी अमित शहा यांच्याकडे शब्द टाकणार का? किंवा सुनील तटकरे यांनी पालकमंत्रीपदाचा प्रस्ताव मांडल्यावर अमित शाह हिरवा कंदील दाखवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…