पंडित शेठ पाटील १६ एप्रिलला करणार भाजपमध्ये प्रवेश… पंडितशेठ असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये सामील होणार…

0
33

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

शेकापमधील ज्येष्ठ नेते पंडित शेठ पाटील यांनी  भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला असून, त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील होणार आहेत. हा प्रवेश स्थानिक राजकारणात मोठा भूकंप मानला जात आहे.

पंडित शेठ पाटील यांनी शेकाप नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट केलं की, “शेकापमध्ये सध्या नेतृत्वाची कमतरता असून, गेल्या काही काळात मला सातत्याने डावललं जात होतं.” त्यांनी पुढे सांगितलं की, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असता त्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. “तुम्ही भाजपमध्ये या, आपण ग्रामीण भागातील वंचित जनतेसाठी एकत्र काम करू,” असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं, असंही पाटील यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीची ताकद मोठी होती, परंतु आता त्या आघाडीत नेतृत्व संकट उभं राहिलं आहे. यामुळे जनतेचा भ्रमनिरास होत असून, विकासाच्या मुद्द्यावर भाजपच सक्षमपणे काम करत असल्याचं पाटील यांचं मत आहे.

या निर्णयामुळे रोहा व संपूर्ण रायगड जिल्ह्यात भाजपला नवे बळ मिळणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पंडित शेठ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश ही राजकीय घडामोड लक्षवेधी ठरत आहे.