रेवदंडा पंचशीलनगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी… 

0
109

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (ओमकार नागावकर):-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निम्मित पंचशीलनगर रेवदंडा येथे भव्य कार्यक्रम करण्यात आला. यावेळी रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व सर्व मान्यवरच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे, ग्राम.सदस्य राजेंद्र वाडकर, सौ.भारती प्रफुल्ल मोरे, राजेंद्र चुनेकर, संदीप खोत, सुरेश खोत, निलेश खोत, शरद वरसोलकर, विश्वनाथ घरत, चंद्रकांत झावरे, सुराराम माळी, सुहास घोणे व मान्यवर उपस्थित होते.

पंचशील युवक मंडळ, माता रमाई महिला मंडळ रेवदंडा पंचशीलनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ठिकाणचे कार्यक्रम तसेच मिरवणूक शांततेत पार पाडाव्यात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. सर्वांनी आनंदात आणि शांततेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे .