महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित प्रथम वर्धापनदिन उत्साहात संपन्न… वर्धापन दिनानिमित्त पनवेलच्यावतीने पुरस्कार सन्मान सोहळा…  

0
27

पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई,रायगड जिल्हा आयोजित पनवेल तालुक्यात प्रथमच  वर्धापन दिनानिमित्त पनवेल येथे भव्य पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात हा पुरस्कार सोहळा प्रमूख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पुरस्कार सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्धसिने अभिनेत्री हेमांगीराव खोपकर, झी२४तास टीव्ही न्यूज चॅनेलच्या निवेदिका मनश्री पाठक, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक सिकंदर शेख सर, कानसा वारणा फाउंडेशनचे अध्यक्ष दिपकदादा पाटील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे सर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय गोविंदजी वाकडे सर, कोकण विभाग अध्यक्ष शैलेशजी पालकर, माजी सभापती वसंत काठवले, दैनिक नवभारत, दैनिक नवराष्ट्र महाव्यवस्थापक सचिन पुलगावकर, अभिनेत्री विद्या ठाकूर पनवेलचे विद्यमान आमदार श्री. प्रशांत ठाकूर साहेब, पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री. प्रितमदादा म्हात्रे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कॅबिनेटमंत्री मा. भरतशेठ गोगावले हे काही महत्वाच्या कामामुळे उपस्थित राहू शकले नाही त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. श्री.प्रितमदादा म्हात्रे यांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. आंदवनभुवनी या समर्थ रामदासांच्या ओव्यांनी कलावतीताई पाटील यांनी ईशस्तवन सादर केले. उपस्थित सर्व मान्यवरांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.रा.जि.प.शाळा वार्दोली आणि भाताण येथील विद्यार्थ्यांनी आई भवानी तुझ्या कृपेने… पारंपरिक कोळीगीते लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तदनंतर झी२४ तास न्यूज चॅनेलच्या निवेदिका मनश्री पाठक मॅडम, डॉक्टर गिरीशजी गुणे, प्रितम म्हात्रे, सिकंदर शेख सर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या. पनवेलमधील गोरगरिबांचे सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे, झी२४ तास न्यूज चॅनेलच्या निवेदिका मनश्री पाठक मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पेण तालुक्यातील सात मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले या रत्नांमध्ये पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मंगेशजी नेने साहेब यांना ‘आदर्श शिक्षणतज्ञ पुरस्कार’, डॉ. किशोर देशमुख यांना सामाजिक-शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार, कल्पेश ठाकूर यांना देवदूत पुरस्कार, अनिल खामकर यांना महाराष्ट्र पोल्ट्री योध्या पुरस्कार, सचिन शिंगरुत यांना राष्ट्रीय खेळरत्न पुरस्कार, डॉ. संजय सोनावणे यांना उद्योगराज पुरस्कार, तर डॉ. देविदास बामणे यांना राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करून गौरविण्यात आले. सरपंच सौ. उमाताई मुंढे यांच्या ग्रुप ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा ‘स्मार्ट पर्यावरण पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पुरस्काराने प्रेरणा मिळते. आपल्या अवतीभवती समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मातब्बर मंडळी कार्यरत असतात. परंतु आपल्याला त्यांची ओळख नसते या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून अशी नवरत्ने पारखून त्यांना समाजासमोर आणण्याचे काम आज पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई रायगड जिल्हा अध्यक्ष राकेशजी खराडे , पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले आहे. हा पुरस्कार सन्मान सोहळा पार पडण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष शैलेश चव्हाण, पनवेल तालुका उपाध्यक्ष दिपक कांबळे, पनवेल शहर अध्यक्ष असीम शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पनवेल रायगड जिल्ह्यातील पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित होते…