रोहा शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
श्री. धावीर मिनिडोअर मालक चालक संघटना रोहा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. रोहे कोलाड मार्गावरील रायकर पार्क प्रवेशद्वार जवळील मिनिडोअर स्टॅण्ड येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भजन,कीर्तन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. गेली अनेक वर्षे ही परंपरा सुरू आहे. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
स्नेहांकित मा. आमदार अनिकेत तटकरे , रायगड जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ पाटील , रोहा संघटने चे अध्यक्ष महेंद्र कांबळे,उपाध्यक्ष विलास पालवणकर, विजय शेटके, सुजय फुलारे, किरण भगत, प्रमोद भगत, जगदीश मोरे, यांसह प्रमोद डीगे, संजय पवार, अशोक कांबळे, मधुकर बोरेकर, यांसह अन्य सदस्य पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले, सत्यनारायणाच्या महापूजेचा लाभ अनेक नागरिकांनी प्रवासी वर्गाने घेतला. विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ वरसे यांनी उत्तम असे भजनाचे सादरीकरण केले. महापूजा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिनिडोअर चालक मालकांनी परिश्रम घेतले.