महत्वाचा टप्पा पार करीत पुणे मेट्रो अपडेट… स्वारगेट-कात्रज भूमिगत पुणे मेट्रोला अखेर मुहूर्त..

0
25

मुंबई शिवसत्ता टाइम्स( देवेंद्र मोरे):-

प्राप्त माहितीनुसार महत्वाचे टप्पे पार करत पुणे मेट्रोच्या स्वारगेट-कात्रज भूमिगत मार्गाचा अखेर मुहूर्त साधून आला आहे. पुढील ३-४ महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे…
पुणेकरांच्या मागणीनुसार पद्मावती आणि बिबवेवाडी या दोन स्थानकांचा समावेश प्रोजेक्ट मध्ये करण्यात आला आहे… सन २०२९ दरम्यान हा ५.४६ कि.मी.चा मार्ग पूर्ण होईल व त्यासाठी ३,६४७ रुपये कोटींचा खर्च अपेक्षित आहे…

पुणे मेट्रो म्हणजे शहराच्या वाहतूक समस्यांवरील एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे, प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज भूयारी मार्ग लक्षवेधी ठरणार आहे, कारण हा मार्ग पुण्याच्या दक्षिण उपनगरांना शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणार आहे… प्रदीर्घ विलंबानंतर हा पुण्याच्या वाहतूक प्रश्नांवरील महत्वाकांक्षी प्रकल्प आता पुढे सरकत आहे… या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करून सन २०२९ च्या दरम्यान कार्यान्वित करण्याचे प्रयोजन आहे… या प्रकल्पाअंतर्गत नियोजित दोन नवीन स्थानकांमुळे स्थानिकांची गैरसोय निश्चितपणे दूर होणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिपादन केले…