भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४वा जयंत्युत्सव दापोलीत राज्य गृहमंत्री योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत संपन्न… 

0
35

दापोली शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):- 

दापोली येथील बौद्धजन सेवा संघ – मुंबई, तालुका दापोली-मंडणगड आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती महोत्सवासाठी  महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा.ना. योगेशदादा कदम यांचे आगमन होताच जिल्हा बौद्धजन महासंघाचे अध्यक्ष प्रीतम रुके यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी नामदार योगेशदादा कदम तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नामदार योगेश दादा कदम तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी यांचे बौद्धजन सेवा संघाच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आले.

उपस्थित सर्व बांधवांना मार्गदर्शन करताना ना. योगेशदादा कदम म्हणाले की भारताला सुपूर्द केलेल संविधान हे किती चांगलं लिहिल गेले आहे की वाईट लिहिले गेले आहे याला जास्त महत्त्व नाही तर संविधानाची अंमलबजावणी करणारी माणसे किती चांगली आहेत हे महत्त्वाचे आहे. तसेच माणसाने जात पात धर्म समाज न मानता आपण माणूस म्हणून जगलो पाहिजे हेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी राज्यभर जनसेवा करत असल्याचे नमूद केले.

यावेळी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निलेश शेठ,ळ तालुका समन्वयक सचिन जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेठकर, शहर प्रमुख पप्पू रेळेकर, माजी नगरसेवक प्रकाश साळवी उप-जिल्हाधिकारी अमित पारदुले, अनिल पवार तसेच बौद्धजन सेवा संघ तालुका दापोलीचे सभापती महेंद्र चाफे, उपसभापती प्रकाश तांबे, संस्थेचे अध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष विलास तांबे, सेक्रेटरी रुपेश कासारे, तालुका कार्यकारणी दापोलीचेअध्यक्ष शरद जाधव, सचिव सुरेश मोरे, जिल्हा बौद्धजन महासंघाचे अध्यक्ष प्रीतम रुके उपस्थित होते.