रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-
जिल्ह्यातील नवखार येथे हनुमान पालखी घरासमोर का नाही थांबविली असे विचारताच… विशाल उत्तम पाटील, समाधान उत्तम पाटील, आशु विशाल पाटील, प्रकाश सिताराम पाटील, राजेश प्रकाश पाटील, वैभव दिलीप पाटील, विक्रम उत्तम पाटील, जयेंद्र रमाकांत वर्तक (सर्व राहणार – रांजनखार डावली, नवखार तालुका अलिबाग) यांच्याविरोधात अस्मिता प्रमोद पाटील (वय ३३ वर्षे रांजनखार डावली,रा.नवखार ता. अलिबाग जि.रायगड) हिने मांडवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालुक्यातील नवखार येथे दि. १२/०४/२०२५ रोजी रात्रौ ११.१५ सुमारास गावात श्री. हनुमान जयंतीच्या पालखीचा कार्यक्रम चालू असताना सदरची पालखी रामनाथ सदू पाटील यांचे घराजवळ येताच अस्मिता पाटील, त्यांची जाऊ ऋतुजा सुजित पाटील व घरातील इतर माणसे पुजा करण्यासाठी जात असताना पालखी सोबत असणारे नवखार गावातील विशाल उत्तम पाटील, समाधान उत्तम पाटील, आशु विशाल पाटील, प्रकाश सिताराम पाटील, राजेश प्रकाश पाटील, वैभव दिलीप पाटील, विक्रम उत्तम पाटील, जयेंद्र रमाकांत वर्तक यांनी पालखी पुजा करण्यासाठी न थांबवता पुढे घेवून गेले म्हणून त्यांना पालखी पुढे का नेली… पुजा करायची आहे… असे म्हणताच पुर्ववैमनस्याचा मनात राग धरून त्यांनी शिवीगाळ करून त्यांचे पैकी आशु विशाल पाटील यांनी अस्मिता पाटील यांचे पती प्रमोद यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून दुखापत केली म्हणून अस्मिता पाटील व नातेवाईक भांडणे सोडविण्यास गेले असता विशाल उत्तम पाटील, प्रकाश सिताराम पाटील यांनी माझी मान धरून शिवीगाळी केली. तसेच इतर जणांनी आम्हाला शिवीगाळी करून मारण्याची धमकी दिली. अस्मिता पाटील यांचे पती प्रमोद यांचे डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात औषधोपचारार्थ दाखल करण्यात आले.
मा. जिल्हादंडाधिकारी सो., रायगड अलिबाग यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मांडवा (सागरी) पोलीस ठाणे येथे (45/2025) मुंबई पोलीस अधिनियम, 1951 37(1) (3), भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 352,351(2), 190, 191(2),191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सुधीर पाटील हे क