ग्रामीण गर्भवती महिलांची “१०२” रुग्णवाहिका सेवा ठप्प होणार, शासकीय इंधन-निधी अभावी घरघर…

0
20

मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-

प्रामुख्याने ग्रामीण भागातील गर्भवतींसाठी १०२ या क्रमांकावर डायलींग करताच सहज उपलब्ध होणारी रुग्णवाहिका सेवा सध्या ठप्प झाल्यागत दिसत आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा हा चिंतेचा विषय झाला आहे. याबद्दल प्राप्त माहितीनुसार बेधुंद सत्ताधारी आणि अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे अथवा दुर्लक्षितपणाने या “१०२” रुग्णवाहिका सेवा योजनेच्या शासकीय निधी अभावी इंधनाचा प्रश्न उभा राहिल्याने ही योजना ठप्प होणार की काय अशी साशंकता ग्रामस्थांना सतत भेडसावत आहे. ही सेवा बंद झाल्यास ग्रामीण गर्भवती महिलांचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्तरावर आरोग्य योजना अंतर्गत हा प्रश्न मार्गी लागून निधी उपलब्ध झाला तर इंधना अभावी ही योजना बंद पडण्याची वेळ शक्य नाही व ग्रामीण भागातील गर्भवतींना अत्यावश्यक समयी धीरोदात्त अवसान मिळेल.