रसायनीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी… रिस येथून भव्य दिव्य वातावरणात धुमधडाक्यात मिरवणुक…  

0
26

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):- 

बौद्ध समाज एकीकरण संघ रसायनी परिसर व सम्यंक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

सायंकाळी रिस येथूनच भव्य दिव्य मिरवणुक निघाली.डीजे व ढोल ताशांच्या गजरात  फटाकांच्या आताषबाजीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व महापुरुषांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून निघाला मिरवणुकीत मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी झाले होते.रिस येथून निघालेल्या मिरवणुकीचे ठीक ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे विविध राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. मिरवणुकीत माजी सरपंच संदीपशेठ मुंढे, रोशन राऊत,बबलू मुकादम,शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिलशेठ पिंगळे,लायन ग्रुपचे जितेंद्र फडके,उपाध्यक्ष रवी शेळके,खजिनदार संदेश लहाने, चेतन गायकर,चांभालीऀ ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच दत्ताशेठ जांभळे,सद्गुना पाटील, भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती संपर्कप्रमुख सचिन दुर्गे, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रसायनी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध समाज एकीकरण संघाचे प्रवीण खंडागळे, दीपक इंगळे,सम्यंक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड, गणेश जावळे,तायडे सर,ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पनवेल तालुका मा.अध्यक्ष दयानंद सरवदे,सुदेश जाधव,महादेव कांबळे,मोहन कांबळे, अजित कडलक,संदीप वानखेडे,फुलचंद लोंढे, जावळे सर आदींनी विशेष मेहनत घेतली.