शेलघर येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीला उत्तम प्रतिसाद… अंतुलेंचे वारसदार म्हणून निश्चित महेंद्रशेठ घरतांचा विचार करणार…

0
22

उरण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक काँग्रेसचे कोकणचे निरीक्षक आणि माजी महापौर राजेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी दि.. 22 एप्रिल रोजी पार पडली.त्यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी राजेश शर्मा यांचे स्वागत केले.शेलघर येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

महेंद्रशेठ घरत हे डॅशिंग नेतृत्व आहे,त्यांनी रायगडमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी दिली…हे कार्यकर्त्यांचे म्हणणे मला मान्य आहे…त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे..अंतुलेंचे वारसदार म्हणून  निश्चितच आगामी काळात त्यांचा विचार होईल,असे मत राजेश शर्मा यांनी शेलघर येथे व्यक्त केले.

यावेळी राजेश शर्मा पुढे म्हणाले, की “तळागाळात गांधीवादी  विचार पेरून काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न करू या, रायगड हा अंतुलेंचा बालेकिल्ला आणि काँग्रेसला वाढवण्याची महेंद्रशेठ घरत यांच्यात धमक आहे. सोशल मीडिया मजबूत करा, पक्षाची तरुणांना जोडा आणि कामाला लागा,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.कार्यकर्त्यांची विचारपूस करणारा नेता हवा आणि आर्थिक ताकद देणाराही हवा, यासाठी महेंद्रशेठ घरत हेच सक्षम आहेत,” असे मत बैठकीसाठी आलेल्या बहुसंख्य पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

या बैठकीला कोकणचे निरीक्षक राजेश शर्मा होते.त्यांनी पदाधिकारी यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
सरचिटणीस मिलिंद पाडगावकर,ॲड.श्रद्धा ठाकूर,अखलाख शिलोत्रे आदी उपस्थित होते.या बैठकीला रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.