2025-2030 या कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर… अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश…

0
18

रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे):-

दि. 22 एप्रिल 2025 रोजी मा.जिल्हाधिकारी रायगड,अलिबाग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये सन 2025-2030 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या यादीनुसार एकूण 64 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले असून त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण वर्गात महिलांना भरघोस संधी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींसाठी खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे :
सानेगाव, विरझोली, चणेरा यांस अनुसूचित जाती व अनुसूचित जाती महिला यांत आरक्षित करण्यात आले असून; न्हावे, वणी, कोंडगाव, पाटणसई, खारगाव, कोलाड, वांगणी, ऐनवहाळ, धामणसई, कडसुरे यांस अनुसूचित जमाती व त्यातील महिला वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

भिसे, दापोली, वरसगाव, वाली, गोव, खांब, वरवठणे, देवकान्हे, तांबडी, मढाली खु., जामगाव, चिंचवली (दिवाळी), नेहरुनगर, पुई, पळस, येरळ, भातसई या ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला यांना आरक्षित करण्यात आल्या आहेत.

तसेच, धोंडखार (तर्फे बिरवाडी), नागोठणे, खैरेखुर्द, वरसे, मेढा, शेणवई, आरे बुद्रुक, कुडली, धाटाव, तळवली (अष्टमी), महाळुंगे, पिंगळसई, तिसे, पुगाव, खांबेरे, चिचवली (आतोणे) यासारख्या ग्रामपंचायती सर्वसाधारण (महिला) वर्गात आरक्षित करण्यात आल्या आहेत.

मालसई, रोठ खुर्द, तळाघर, वावेपोटगे, निडी (अष्टमी), आंबेवाडी, किल्ला, सारसोली, शेडसई, भालगाव, घोसाळे, संभे, कोकबन, वाशी, पहूर, ऐनघर या ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गात ठेवण्यात आल्या आहेत.या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, विशेषतः महिलांना नेतृत्वाच्या संधी वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.