पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करा,पक्ष सदैव तुमच्या पाठीशी… उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदींचे वक्तव्य…

0
19

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):- 

भारतीय जनता पक्षाने जनतेच्या कल्याणासाठी आणि त्यातून पक्षाची ताकद निर्माण व भारतीय जनता पक्षाला जनतेत उभारी देण्यासाठी आपली निवड केली असून भारतीय जनता पक्ष आणि आमदार या नात्याने तुमच्या सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका मंडळ अध्यक्षपदी प्रवीण मोरे यांची निवड झाली असून नियुक्ती पत्र आणि सत्कार सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या कार्यालयात संपन्न झाला त्या प्रसंगी आमदार महेश बालदी बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी यांनी प्रत्यकाने जनतेचे काम करा, पक्ष आणि आमदार या नात्याने मी सर्व प्रकारची मदत करेन असे आश्वासन दिले.उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.निवडणूक प्रमुख जितेंद्र घरत यांनी बुथ कमेटीचे महत्व व पक्ष मजबूत करण्या सबंधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीरशेठ ठोबंरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीरामशेठ ठोबंरे, माजी सरपंच राजू मोरे, स्थानिक नेते व उद्योगपती विनोद भोईर,तुपगाव सरपंच रविंद्र कुंभार, स्थानिक नेते अभिजित देशमुख, चौक शहर प्रमुख व माजी उप सरपंच गणेश कदम, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण मोरे यांना पुष्पगुच्छ देऊन निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.