मनसे स्टाईलने परप्रांतीयांचा माज उतरवला… स्थानिकांना सुरक्षा रक्षकाची नोकरी पुन्हा मिळवून दिली…

0
18

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):- 

रेवदंडा येथे असलेल्या एका खासगी सुरक्षा रक्षकाच्या परप्रांतीय सुपरवायझर चा माज नुकताच उतरवण्यात आला. सिद्धेश म्हात्रे यांनी मनसे स्टाईलने त्याला दणका देत स्थानिकांना सुरक्षा रक्षकाची नोकरी परत मिळवून देण्यास भाग पाडले.त्यामुळे सिद्धेश म्हात्रे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

रेवदंडा परिसरात एम एम सी नावाची खाजगी कंपनी असून या कंपनीमार्फत सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाते. रेवदंडा परिसरातील दोन जण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मात्र परप्रांतीय सुपरवायझरने स्थानिक असल्याचा राग धरून त्यांना कामावरून काढण्याचा प्रयत्न केला.

ही बाब मनसेचे सिद्धेश म्हात्रे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी परप्रांतीय सुपरवायझरची भेट घेऊन त्याला जाब विचारला.त्यावेळी त्याचा मनमानी कारभार दिसून आला.अखेर मनसे स्टाईलने त्या सुपरवायझरला दणका देण्यात आला. त्यानंतर त्याने स्थानिकांना पुन्हा कामावर सुरक्षारक्षक म्हणून घेण्याचे आश्वासन दिले. सिद्धेश म्हात्रे यांच्यामुळे दोन स्थानिकांना त्यांची नोकरी परत मिळाली.