अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीने अलीबागच्या उसर येथील गेल कंपनीच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केलं आहे… कंपनीच्या प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. यात स्थानिक प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना कंत्राटी कामात प्राधान्य दिले जात नाही. बाहेरील कामगार आणून इथं काम केलं जात आहे. १५० प्रकल्पग्रस्तांना ठेकेदारी पद्धतीत काम देण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिलं होतं मात्र त्याला हरताळ फासण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय…