अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
महाराष्ट्रात महिला तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण हे दिवसेदिवस वाढत असतानाच पेण तालुक्यातील हमरापूर येथील सरपंच राकेश दाभाडे याने एका पीडित महिलेशी प्रेमाचे नाटक करीत तालुक्यातील विविध ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याबाबतची तक्रार पीडित महिलेने सरपंच राकेश दाभाडे याच्याविरोधात पेण पोलिस ठाण्यात दिली आहे… राकेश दाभाडे याला दोन दिवसाच्या पोलिस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पेण पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे. सरपंच राकेश दाभाडे यांनी एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी त्याच्यावर फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हमरापूर गावचे सरपंच राकेश दाभाडे याने पीडित महिलेबरोबर सन २०१० मध्ये प्रेमाचे नाटक करीत लग्न करणार असल्याचे सांगत त्याने दि. १ जानेवारी २०१३ ते १६ एप्रिल २०२५ दरम्यान आरोपी सरपंच राकेश दाभाडे याला पीडित महिला ही खालच्या जातीची असल्याने लग्नास नकार देवून फिर्यादी हिचे स्वतःचे मोबाईलमध्ये काढलेले अश्लिल फोटो याचा फायदा घेवून पिडित महिलेस भेटण्यास बोलावून फिर्यादी हिने नकार दिल्यास ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून झी-गार्डन हॉटेल, कोंबडपाडा, रामवाडी, युनायटेड बिल्डींग येथे बोलावून दि. १२ एप्रिल २०२५ रोजी जबरदस्तीने शारिरीक संबंध केले…
तसेच सदर बाबतीत पिडित महिला ही आरोपी याची पत्नी अक्षता दाभाडे हिस सर्व हकिगत सांगण्याकरीता दि. १६एप्रिल २०२५ रोजी हमरापुर येथे गेली असता आरोपी नंबर दोन सरपंच यांच्या पत्नी अक्षता हिने पिडित महिलेस तू खालच्या जातीची असे बोलल्यानंतर त्यावर फिर्यादी हिने राकेश दाभाडे यांच्या पत्नी अक्षता हिला शांतपणे बोलण्याबाबत सांगितले असता सरपंच राकेश दाभाडे म्हणाला की, माझ्या पत्नीबरोबर नीट बोल व तुला जे काही करायचे आहे ते कर तुम्ही सर्व खालच्या जातीचे आहात बोलून पिडित महिलेस जातीवाचक बोलून अपमानीत केले…
त्याप्रमाणे पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार पेण पोलिस ठाण्यात भा.न्या.स.कलम ६४,६४(२),(एम), ३५१(२), ३(५), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम (३) (आर),३(१) ( एस ) ३ (१) (डब्ल्यू) (i) (ii) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे… याबाबत पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत… दरम्यान आरोपीस दिनाक २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहाच्या सुमारास अटक केले… आणि आरोपी राकेश दाभाडे यास २२ एप्रिल २०२५ रोजी पेण येथील न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे…