पहलगाममधील २६-२७ निरापधाऱ्यांचे बळी हा काही हादसा नसून शेजारी कर्मठ धर्मांधांचा पूर्व नियोजित व्यूह होता.
सन् १९९० नंतर कात टाकू पाहणारा, सततच्या धगात होरपळणारा भारताचा मुकूटमणी काश्मीर आणि हिंदूस्थानच्या पंखाखाली विसावू पाहणारे काश्मीरी यांची रोजी-रोटीच बंद करून बेरोजगारीच्या तिडकेने परत हाती बंदुकी घेऊन आपल्या गुटात सामिल होत अराजकतेचे थैमान माजवावे आणि काश्मीरात आपले पाय रोवण्याचे ईप्सित साध्य व्हावे हा उद्धाम फैसला होता.