दिवा-सावंतवाडी गाडीच्या थांब्यासाठी पेणकरांची आग्रही मागणी… दिवा-सावंतवाडी गाडीचा पेण स्थानकावर १ मेपासून थांबा करावा…

0
22

पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

पेण रेल्वे स्थानक येथे दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या मध्य रेल्वे व मुंबई मंडळ अंतर्गत स्थानिक खासदार यांच्यासोबतच्या चिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर पेण प्रवासी संघ व समस्त पेणकरांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पेण प्रवासी संघाने मा. राज्यसभा खासदार यांना भेटून दिवा-सावंतवाडी गाडीचा पेण स्थानकावर थांबा १ मे २०२५ महाराष्ट्र दिनापर्यंत पूर्ववत करावा, अशी आग्रही मागणी केली आहे.

यावेळी गाडीला थांबा का द्यावा, याचे सविस्तर संदर्भ, रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार, पेण स्थानकाच्या सुधारित दर्ज्याची मागणी व रेल्वे प्रशासनाने दिलेली सकारात्मक उत्तरे या सर्वांचा लेखी अहवाल खासदारांना सादर करण्यात आला. दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी पेण प्रवासी संघ आढावा बैठक घेत असून आजची बैठकही प्रसारमाध्यमांद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात आली. यावेळी संघाचे प्रमोद जोशी, निलेश देसाई, विकास दातार, जोगळेकर व सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे उपस्थित होते.दिवा-सावंतवाडी गाडीला १ मे पर्यंत पेण थांबा मिळायलाच हवा अशी ठाम भूमिका हरीश बेकावडे यांनी मांडली.