मस्जिद बंदर खडक भागातील नागरिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश… निलेश लंके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी गटात भव्य पक्ष प्रवेश…

0
22

मुंबई शिवसत्ता टाइम्स (शेखर म्हात्रे):-  

मुंबईतील मस्जिद बंदर खडक विभागातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी  राष्ट्रवादी (SP )गटाचे पारनेर(अहिल्या नगर) चे खासदार आणि सामाजिक नेतृत्व असलेले निलेश लंके यांच्या नेतृत्वात भव्य पक्ष प्रवेश केला भव्य जाहीर सभा सुद्धा घेण्यात आली. मुंबई मस्जिद बंदर खडक विभागाचे राष्ट्रवादी (SP ) गटाचे  महासचिव मोईन काश्मिरी यांच्या आयोजनपर भव्य जाहीर सभा आणि पक्ष प्रवेश यावेळी झाला.यावेळी मस्जिद बंदर खडक विभागाचे मोईन काश्मिरी यांच्या नेतृत्वात अनेक मुस्लिम कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक यांनी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला.अब्दुल भाई, नियाज भाई,अमीन भाई, माजिद भाई, अस्लम मर्चंन्ट, सादिया मर्चंन्ट,अली भाई, बोहरा समाज जे पदाधिकारी युसुफ टोपीवाला भाई,मुस्तफा शाह, अली खातीब,सैजादा भाई या सर्व  मुस्लिम नागरिक पदाधिकारीनी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते राष्ट्रवादी (SP )गटात जाहीर पक्ष प्रवेश केला…

तर खासदार निलेश लंके यांना हज यात्रा मक्का मदिना,अजमेर शरीफ आणि आरोग्य (मेडिकल )अश्या तीन फायली देण्यात आल्या…या तीन फायली देऊन आमचा आवाज पार्लमेंट (अधिवेशन ) मध्ये पोचवून आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. निलेश लंके म्हणालेत सुद्धा कि मी येणाऱ्या जून जुलै महिन्याच्या अधिवेशनात हा मुद्दा नक्की उचलणार आणि शासना पर्यंत नक्की या फायली पोचवणार व तुमच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले. जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेल्या नागरिकांना मौन बाळगून श्रद्धांजली देण्यात आली…अनेक पदाधिकारी आणि नागरिकांची भाषणे यावेळी झाली.पहलगाम अतिरिकी हल्ल्यावरून जाती धर्मात तेढ निर्माण होईल आणि भांडणे होतील असे स्पष्ट दिसत असल्यामुळे हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई, दलित अश्या सर्व समाजाने एकत्र येऊन चिंतन केले पाहिजे, यावर तोडगा काढला पाहिजे. हिंदू मुस्लिम वाद थांबवला पाहिजे. आपण एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांचे सन उत्सव साजरे करतो, एकमेकांच्या घरी जेवतो, उठतो, बसतो तर थोडंसं समजून आपण जाती भेदभाव विसरून एकत्र यायला हवं असे आव्हान जनतेला मोमीन काश्मिरी यांनी केले.निलेश लंके यांच्या हस्ते लहान मुलांना वह्याचे वाटप करण्यात आले. तर निलेश लंके प्रतिष्ठान ही सामाजिक योजना मुंबईत राबवून आम्ही सर्व कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होऊन कार्य करू. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, अंतर्गत कामे करू. गरजूना आर्थिक मदत करू. लंके साहेबांचा अंत्यन्त साधेपणा, विश्वासू व्यक्तींचे कामाची दखल घेऊन आज आम्ही खडक विभागातील सर्व पदाधिकारी, नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस (SP) गटात जाहीर पक्ष प्रवेश करत असल्याचे सांगण्यात आले. आम्हाला आमचे प्रश्न कसे सोडवले जातील, आम्हाला न्याय कसा मिळेल,आमचा आणि sarv समाजाच्या दृष्टीने विकास कसा होईल तर निलेश लंके यांची कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत आम्ही निर्णय घेतला. या विभागाचे आमदार अमीन पटेलने साधी थोडकी काहीही विकासाची कामे केलेली नाहीत तर आम्ही साधी माणसं असल्या माणसा जवळ काय अपेक्षा करणार!असे पदाधिकारी सोहेल काश्मिरी प्रसारमाध्यमाशी बोलत होते.या भव्य जाहीर सभा आणि पक्ष प्रवेशास प्रचंड गर्दी झालेली होती. खडक विभागातील नागरिकांचा उस्पुर्त प्रतिसाद मिळाला…