मित्रांसोबत पोहायला गेला आणि माघारी परतलाच नाही… मोरबे धरणात बुडून २० वर्षीय अनिकेत भगतचा मृत्यू…

0
13

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

पिल्ले कॉलेज रसायनी येथील तिसऱ्या वर्गात शिकणारा अनिकेत किसन भगत याचा मोरबे धरणात बुडून याचा मृत्यू झाला.अनिकेत किसन भगत वय वर्ष २० हा राहणार सुकापूर भगत वाडी पनवेल येथील विद्यार्थी असून आज परीक्षा संपल्यावर आणि उद्या पासून सुट्टी असल्याने मित्रांसोबत नवी मुंबई महानगर पालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आला. सर्व मित्र पाण्याबाहेर असताना पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला, काही अंतर गेल्यावर त्याची दमछाख झाली. आणि त्यातच तो बुडून मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी ही माहिती स्थानिकांना दिल्यावर खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार हे उप पोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्यासह दाखल झाले, तात्काळ अपघात ग्रस्त यांना मदत करणारी सामाजिक संस्था प्रमुख गुरुनाथ साठेलकर आपल्या टीम सह दाखल झाले. दीड तास पोहून आणि बोटीने पाण्यात तपास केल्यावर सायंकाळी ५.४५ वाजता मृतदेह सापडला.अनिकेतचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी चौक ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विशाल पवार करीत आहेत.हेल्फ फाऊंडेशन यांची टीम होती