माणगाव शिवसत्ता टाइम्स ( नरेश पाटील):-
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त माणगाव नगरपंचायतीत गुरुवारी, 01 मे 2025 रोजी सकाळी जलशुद्धीकरण केंद्र, उत्तेखोल येथे उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. नगराध्यक्ष सौ. शर्मिला शोभन सुर्वे यांच्या हस्ते सकाळी 7:05 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाला नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी, उपनगराध्यक्ष सौ. हर्षदा सतीश सोंडकर,सभापती सुशीला वाढवळ माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक सचिन बोंबले, नगरसेवक दिनेश राठवडकर, राजेश मेहता, अजित तार्लेकर, श्रीमती सुविधा खैरे, नामनिर्देशीत नगरसेवक सुनील पवार यांच्यासह प्रशासक, कार्यलयीन अधिकारी, कर्मचारी,सफाई कामगार, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कु्वेस्कर, काही प्रतिष्टीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या राष्ट्रगीत गायन केले आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला वंदन करत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमात कामगार दिनाचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनानिमित्तचा हा कार्यक्रम एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेच्या मूल्यांना उजाळा देणारा ठरला.