कामगार स्मृती चषक आदिवासी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ…

0
19

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-  

राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) लिमिटेड,थळ यांच्यातर्फे अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कामगार स्मृती चषक जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेला गुरुवारी दि. १ मे रोजी प्रारंभ झाला.

आरसीएफ वसाहत, कुरुळ येथील क्रीडासंकुलात ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यात ६४ आदिवासी संघ सहभागी झाले आहेत.आरसीएफ थाळचे कार्यकारी संचालक  नितीन हिरडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महाव्यवस्थापक संजीव हरळीकर,महाव्यवस्थापक सुधीर कोळी,अभय कालबाडे ,व्ही .मगेश ,उप महाव्यवस्थापक विनायक पाटील , सर्व संघटनांचे प्रतिनिधी , मानव संसाधनचे अधिकारी , प्रशासनाचे अधिकारी  वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ राकेश कवळे, माजी राष्ट्रीय खेळाडू दिलीप धुमाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्पर्धेत विजेत्या संघास रोख रुपये २५०००/-  व चषक ,  उपविजेत्या संघास रोख रुपये १५०००/-  व  चषक, तृतीय व चतुर्थ क्रमाक मिळवणाऱ्या संघास रोख रुपये १००००/ –  व चषक अशी सांघिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई यांच्यासाठी रोख रक्कम व चषक अशी वैयक्तीक बक्षिसे देण्यात येणार आहेत.