डंपिंग ग्राउंडवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे आज 1 मे रोजी शानदार उदघाटन…

0
18

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-

डंपिंग ग्राउंडवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी नागराध्यक्ष श्रीमती शर्मिला सुर्वे, मुख्यधिकारी संतोष माळी, उपनगराध्यक्ष श्रीमती हर्षदा सोंडकर, सभापती श्रीमती सुशीला वाढवळ, ईतर मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या प्रकल्पामुळे परिसरातील कचऱ्याची समस्या कमी होऊन पर्यावरण पूरक उपाययोजना अंमलात येणार असल्याची नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

उद्घाटन सोहळ्याच्या वेळी संबंधित यंत्रसामुग्री कार्यान्वित करण्यात आली व प्रत्यक्ष प्रक्रिया कार्याला सुरुवात झाली. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रांद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि पुनर्वापर सुलभपणे होणार आहे. यामुळे केवळ स्वच्छता नाही तर पर्यावरण संवर्धनासही चालना मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे भविष्यात स्थानिक नागरिकांना आरोग्यदायी आणि स्वच्छ वातावरण मिळण्यास मदत होणार असून, स्थानिक प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.