डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न केल्याने सरपंच बडतर्फ… शाम कासारे यांच्या प्रयत्नांना यश वाळसुरे ग्रामस्थांमध्ये आनंद उत्साह…

0
21

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

किल्ले रायगडच्या परिसरातील वाळसुरे दत्तवाडी ग्रामपंचायतिला दोन वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न करणे भोवले. वंचित बहुजन आघाडीने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर तेथील सरपंचांना बडतर्फ करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. वाळसुरे येथील विद्यमान सरपंच व सदस्यांनी 14 एप्रिल 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याच दिवशी साजरी केली नाही. शासन आदेश असतानाही जयंती साजरी न झाल्याने तेथील ग्रामस्थांनी हे प्रकरण उचलून धरले होते.

यामुळे ग्रामपंचायतीने 17 एप्रिल 2023 रोजी जयंती साजरी केली खरी परंतु शासन परीपत्रकानुसार कामामध्ये कसूर सोडलेला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी न केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून सरपंच विरोधात तक्रार दाखल केली होती. याबाबत प्रशासनाने निर्णय घेऊन धडा शिकविला आहे. याप्रकरणीवंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शाम कासारे यांनी कोकण विभागीय आयुक्तानकडे तक्रार केली होती. त्यानुसार सुनावणी झाल्यानंतर दोन्ही बाजूकडील म्हणणे ऐकल्यानंतर 16 एप्रिल 2025 रोजी ग्रामपंचायती विरोधात निकाल देऊन सरपंचांना पदावरून काढून टाकण्याचा आदेश सूर्यवंशी यांनी दिला सरपंच बडतर्फ झाल्याने आज दि. 30 एप्रिल 2025 रोजी वाळसुरे गावात छोट्या खानी शाम कासारे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी वाळसुरे ग्रामस्थांमध्ये उत्साह पहायला मिळाला.