पेण तालुक्यातील 47 शाळा होणार टकाटक… पावसाळ्यापूर्वी सर्व शाळांना मिळणार नवा लूक…

0
20

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी) :- 

पेण तालुक्यातील 47 शाळांना गतवर्षी नवा लूक मिळणार असून त्याची पूर्तता केली जाणार आहे… तालुक्यातील अनेक शाळा टकाटक होणार असून एप्रिलमध्ये झालेला अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्यांच्या तडाख्यात काही शाळांची पडझड झाली आहे… त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची देखभाल दुरुस्ती डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत…

यावर्षी पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी जिल्हा परिषद सेस फंड आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 2 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन उपलब्ध झाल्याने तालुक्यातील 47 शाळांना नवा साज चढविण्यात येत आहे… यामुळे पावसाळ्यापूर्वी सर्व शाळांचा नवा लूक विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे…

जिल्हा परिषद सेस फंड शाळागृह देखभाल आणि दुरुस्तीच्या माध्यमातून तुरमाळ आणि निगडे जिल्हा परिषद शाळांना 8 लाख 84 हजार रुपये मंजूर केले आहेत… या निधीतून शाळांची विविध कामे करण्यात येणार आहेत.

या शाळांमध्ये तरणखोप, वाशी, दुश्मी, हेटवणे,कुहीरे कातकरी वाडी, तळवली, कामार्ली आदिवासी वाडी, खारपाले, टाकाची वाडी, कोप्रोली, वाकरुळ, सिंधलाची वाडी, करंबेली आराव, वढाव यांसह एकूण 47 जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्गखोल्या आणि दुरुस्तीसाठी तब्बल 2 कोटी 13 लाख रुपये मंजूर झाले आहेत…

शिवाय प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण 6 योजनेच्या माध्यमातून निधवली ग्रामपंचायत हद्दीतील कावजी वाडी जिल्हा परिषद शाळेची पत्राशेड टाकण्यासाठी पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत.