मोहोपाड्यात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन…

0
100

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वासांबे-मोहोपाडा हद्दी मध्ये सोलर पथदिवे व हायमॅक्स बसविण्याचा कामाचा भूमिपूजन सोहळयाचे उद्घाटन कोकणचे भाग्यविधाते रायगडचे खासदार तथा पेट्रोलियम व नैसर्गिक वायु समिती,भारत सरकारचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार असुन कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी हे उपस्थित राहणार आहेत.

शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी १० वाजता ग्रुप ग्रामपंचायत वासांबे कार्यालयात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमा प्रसंगी दिव्यांगांसाठी घरघंटी वाटप,वासांबे ग्रामपंचायत हद्दीत पिशवी वाटप,तसेच वासांबे ग्रामपंचायतच्या माजी सरपंचांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सौ.उमा संदीप मुंढे व उपसरपंच भूषण लक्ष्मण पारंगे व सर्व सन्माननीय सदस्यांनी केला आहे…