एक दिवस आगोदर या सर्व महापुरुषांच्या जीवनावर आधारीत १००  गुणांची परिक्षा घेण्यात आली होती… 

0
35

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

एससी एसटी आर्थात मागासवर्गीय संघटना बिएसएनएल व बिएसएनएल प्रशासन रायगड याच्या संयुक्त विद्यमाने रायगड च्या पनवेल येथील कार्यालयात डीजीएम शशिकला दाबके मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी व राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती आयोजीत करण्यात आली होती या कार्यक्रमास सेवा महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष भूपेश माळवे, सुजीत सोनावळे बामसेफ कार्यकर्ते प्रमुख वक्ते उपस्थित होते यावेळी दिपक जाधव, तुषार शेणवी, प्रमोद पाटील यांचीही भाषणे होऊन प्रस्तावीक भाषण व आभार प्रदर्शन सेवा रायगड मुख्य मार्गदर्शक सुनील जाधव सेवानिवृत यानी केले असून या कर्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या प्रतीमांचे द्वीप प्रज्वलन व पुष्पमाला आर्पण करुन पुजन करुन त्रीशरण पंचशील व भीम स्मरण, भीम स्तुती झाल्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करून कार्य्रक्रमाला सुरुवात करण्यात आली…

एक दिवस आगोदर या सर्व महापुरुषांच्या जीवनावर आधारीत १००  गुणांची परिक्षा घेण्यात आली होती… त्या परिक्षार्थीनी मीळवलेल्या यशाबद्दल व सहभागाबद्दल सर्व परिक्षार्थीना प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले त्याच प्रमाणे ज्या ज्या कर्मचा-यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या सहकार्य केले त्या सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आले… शेवटी शरणगाथेने कर्यक्रम संपवून सांस्कृतीक कार्यक्रमास सुरवात करण्यात आली… या कार्यकमात महेंद्र शिरसाठ, दहे पती- पत्नी, संतोष बनसोडे, भागुबाई खाडे, शैलेंद्र खरे, दिपक जाधव, ईंद्रजीत आग्नीहोत्री यांनी सुंदर गायन करून शेवटी राष्ट्रगीत गाऊन कार्यकमाची सांगता करण्यात आली…