एच.पी.सी.एल.कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण… स्थानिक कंत्राटदारचा स्थानिक कामगारांवर अन्याय? 

0
10

रसायनी शिवसत्ता टाइम्स (आनंद पवार):-

             एच.पी.सी.एल. (HPCL) मधील कंत्राटी कामगारांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवार दि. २९ एप्रिलपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण एच.पी.सी.एल. मधील कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी आहे. या उपोषणातून कामगारांनी त्यांच्या मागण्या सरकार आणि एच.पी.सी.एल. प्रशासनासमोर मांडल्या आहेत.मागील १० दिवसांपासून २१ कंत्राटी कामगारांना घरी बसवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणणाऱ्या स्थानिक कंत्राटदाराच्या अन्यायाविरोधात एच.पी.सी.एल.कंपनीतील कामगार उपोषणावर बसले आहेत.. कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवीत आहेत…कंत्राटी कामगारांना नियमित करणे, वेतन वाढ, सामाजिक सुरक्षा आणि इतर सुविधा मिळवणे.या मुख्य मागण्या घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे…