मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
प्रत्येक बापासाठी आपल्या लेकीचं लग्न खास आणि प्रत्येक लेकीसाठी आपला बाप ‘किंग’च असतो. तिच्यासाठी तो एक पर्वता एवढा आधारही असतो.पण अशा कणखर पर्वतालासुद्धा हळवं मन असतं. बाप-लेकीच्या अशाच अलवार नात्याची झलक राजकारणातील किंगमेकर आणि त्यांच्या लेकीमध्ये दिसून आलीय.महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय कदम यांच्या घरी सनई-चौघडे वाजले आहेत. कदम यांची कन्या तृषिता हिची डॉ.अनन्वय सिंघल यांच्याशी लग्नगाठ बांधली गेली आहे.दि. १० मे रोजी मुंबई पवईतील ग्रँड बॉलरूम या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आहे.चि. सौ. तृषिता, सौ. वैशाली आणि श्री. विजय जगन्नाथराव कदम यांची ज्येष्ठ कन्या, यांनी युके येथून पब्लिक पॉलिसीमध्ये एमएस पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या शिक्षण आणि कार्याची दखल घेत त्यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. दुसरीकडे, चि. डॉ. अनन्वय, दिल्ली येथील प्रतिष्ठित सिंगल कुटुंबातील सुपुत्र, यांनी सर्जरीमध्ये एमएस पदवी संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. दोघांचेही व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व या विवाहाला विशेष महत्त्व प्रदान करत आहे.
हा विवाह सोहळा श्री समर्थांच्या कृपेने यशस्वी होण्यास सज्ज आहे. कदम आणि सिंगल कुटुंबियांचे सर्व नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक या मंगल प्रसंगी आणि वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते..या शुभविवाहाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते…उपस्थितांचे शुभाशीर्वाद आणि प्रेम यामुळे हा सोहळा अविस्मरणीय झाला,असा विश्वास विजय कदम व कुटुंबियांनी व्यक्त केला…
आपल्या लाडक्या प्रिन्सेसच्या लग्न सोहळ्यात कशाचीही कमी पडू नये याची खबरदारी विजय कदम घेत होते…या वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे,रश्मी (वाहिनी )उद्धव ठाकरे,संजय राऊत,अनिल देसाई,सुभाष देसाई,विनायक राऊत,सचिन अहिर,आदेश बांदेकर,सुचित्रा बांदेकर,पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल त्यांचे वडील जोमा तांडेल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती…या विवाहाच्या शुभेच्छा देताना,विजय कदम,वैशाली कदम आणि शर्वरी कदम यांनी सर्वांचे आभार मानले आहेत…सर्वांच्या सहभागाने हा मंगल प्रसंग अधिकच दिमाखदार झाला आहे…