बोलतील तेवढे भाडे द्यावंच लागेल ;रिक्षा चालकांचा मनमानी कारभार…

0
20

खारघर शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):- 

खारघर येथील डी. मार्ट बाहेर उभ्या असणाऱ्या रिक्षा चालकांनी तेथे शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे स्टॅन्ड बनवले आहे. असे असताना तेथून जाणाऱ्या प्रवाशांना मीटर न टाकता रिक्षा चालक सांगेल तेवढं भाडं द्यावं लागतं अन्यथा दुसऱ्या कोणत्याही रिक्षाने जाऊन देत नाही. डी मार्ट रिक्षा स्टॅन्ड वगळता खारघरमध्ये अनेक रिक्षा स्टॅन्ड आहे व युनियन आहेत परंतु त्यांच्याकडून कोणतीही तक्रार नसल्याचे प्रवाशांनी सांगितले व मीटर प्रमाणेच प्रामाणिकपणे भाडे घेत असल्याचे सांगितले परंतु इथे प्रवाशांना का एवढा पैसा का मोजावा लागतो असा प्रश्न प्रवाशांकडून होत आहे. प्रवासी रिक्षा चालकासोबत जास्त बोलले तर अरे – कारेच्या भाषेत सर्व रिक्षा चालक एकत्र जमून भांडण करायला येतात अशी त्यांची दादागिरी सुरू आहे. असे असताना तेथील प्रवासी डी. मार्ट मधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे खरेदी केलेला सामानाच्या पिशव्या असतात नाईलाज त्यांना तेवढे पैसे द्यावेच लागतात…तेथील रिक्षाचालकाच्या रिक्षांची अवस्था बघाल तर रिक्षा भंगार अवस्थेत आहे,त्यांच्याकडे प्रवाशांनी कागदपत्र लायसनची दाखवण्याची मागणी केली असता ती देखील त्यांच्याकडे नाही,काही रिक्षांना मीटरच नाही तर काही रिक्षांचे मीटर बंद अवस्थेत, गणवेश नाही असे असताना पनवेल परिवहन व वाहतूक पोलीस विभाग काय करत आहे असे प्रश्न प्रवाशांकडून होत असून परिवहन विभागाने लवकरच अशा मगरूर रिक्षा चालकांवर बेधडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.