रायगड जिल्हा मुरुड समाजाचा भव्यदिव्य मेळावा संपन्न… मेळाव्याला मंत्री भरत गोगावलेंसह तीन आमदारांची उपस्थिती… 

0
10

रोहा शिवसत्ता टाइम्स (दीप वायडेकर):-  

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात रायगड जिल्हा मुरुड समाज भव्य दिव्य मेळावा आणि सत्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे रोजगार हमी फळ ,उत्पादन व खारलँड मंत्री श्री भरत शेठ गोगावले, स्थानिक विभाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी, चंद्रपूर चिमूर मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार ,अकोला मुर्तीजापुरचे आमदार हरेश पिंपळे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल त्याच प्रमाणे बिग बॉस फेम सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, रील स्टार आणि पहिली मेट्रो चालक रसिका नागे बालकलाकार मायरा जामकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गणेशाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना हार फुल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंत्री भरत गोगावले यांनी समाजाला शुभेच्छा देत समाजाचे प्रोत्साहन वाढवले, महेंद्र दळवी यांच्याकडून समाजाचे कौतुक करण्यात आले, सिने अभिनेत्री बिग बॉस फेम जानवी किल्ले कर या कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या , पंढरपूर चिमूर चे आमदार समाजबांधव किशोर जोरगेवार यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत स्थानिक आमदारांकडून सुमारे एक कोटी रुपयांच्या समाज मंदिराकरिता मागणी केली, त्याचप्रमाणे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी समाज बांधवांना अनोख्या पद्धतीने संबोधित करत समाज बांधवांचे लक्ष वेधून विशेष संबोधन केले. याप्रसंगी कैलासवासी प्रदीप रामचंद्र किल्लेकर (भाई) यांच्या स्मरणार्थ किल्लेदार परिवाराकडून अपंग व्यक्तींना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप करून संपूर्ण भोजनाची व्यवस्था करण्यात आली. याप्रसंगी बुरुड समाजाचे जिल्हाध्यक्ष रुपेश जामकर सचिव जितेंद्र महाले, खजिनदार सुधीर नागे, कोकण अध्यक्ष राजेश मोरे मुरुड तालुका अध्यक्ष परेश किल्लेकर,जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते…